loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा कार्यकर्त्यांनो!, पायात भिंगरी आणि जिभेवर साखर ठेवून काम कराः प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

रत्नागिरी (किशोर मोरे)- पक्षाचा कार्यकर्ता आणि त्याची जबाबदारी महत्वाची आहे. आपण कोणत्या दिशेने जात आहोत, आणि त्यात वाढ कशी होईल हे महत्वाचे ठरते. आपण कार्यकर्ते म्हणून कसे वागले पाहिजे, पायात भिंगरी, जिभेवर साखर ठेवून काम करा, भव्य यश लाभेल, असे मनोगत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त् केले. स्वयंवर हॉल येथे आयोजित भाजपाच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना दिशा दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विपरीत परिस्थीतीमध्ये काम करणारा कार्यकर्ता तयार व्हायला हवा, जिल्ह्यात काम करताना संघटना बांधणीसाठी काम करावे लागेल. राष्ट्रभक्त म्हणून आपली जबबादारी असून तसे काम रत्नागिरीत करा. केंद्रात आणि राज्यात कोणाचे नेतृत्व आहे, याची आठवण लोकांना करुन द्या, राज्यात देवेंद्रजी केंद्रात नरेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगल्या गोष्टी करतय. लढाई लढायची आहे, जिंकण्याकरीता... असा विचार लोकांना सांगा मग समर्थ भारत तर सशक्त भाजप व्हायला हवे. आपण राष्ट्रहिताचे काम लोकांना सांगू. आंदोलन आणि जनजागृती रत्नागिरीकरीता महत्वाची आहे, असे प्रदेशाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg