loader
Breaking News
Breaking News
Foto

बोरिवली (आडीवाडी) ग्रामस्थांचा 'आत्मनिर्भर' आदर्श: लोकसहभागातून रस्त्यांचे रुंदीकरण व झाडी छाटणी

​दापोली (सागर गोवळे) : शासकीय निधी किंवा प्रशासकीय मंजुरीची वाट न पाहता 'आपलं गाव, आपली जबाबदारी' ही भावना उराशी बाळगून काम कसे केले जाते, याचा आदर्श वस्तुपाठ दापोली तालुक्यातील बोरिवली (आडीवाडी) येथील ग्रामस्थांनी घालून दिला आहे. संपूर्ण गावाने एकत्र येत स्वखर्चाने आणि श्रमदानातून गावातील रस्त्यांची सफाई व धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याची मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. बोरिवली आडीवाडी ते पंचनदी आणि बोरिवली आडीवाडी ते चिखलगाव या दोन्ही मुख्य मार्गांवर ही विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे, एसटी बस व इतर वाहनांच्या वाहतुकीस अडथळा ठरणारी झाडी, तसेच वीज वाहिन्यांवर (लाइटच्या तारांवर) लटकणाऱ्या धोकादायक फांद्या हटवण्यात आल्या. कटर मशीन्स, आवश्यक अवजारे आणि इंधनाचा (पेट्रोल-डिझेल) सर्व खर्च ग्रामस्थांनी स्वतःच्या खिशातून केला. ही कोणतीही तात्पुरती मोहीम नसून दरवर्षी न चुकता ग्रामस्थ अशा प्रकारे एकत्र येऊन गावातील मूलभूत प्रश्न स्वतः सोडवतात. ​प्रशासकीय दिरंगाईवर टीका करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य देणाऱ्या बोरिवली (आडीवाडी) ग्रामस्थांच्या या एकजुटीचे आणि 'आत्मनिर्भर' पॅटर्नचे सर्वत्र कौतुक होत आहे.​

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg