loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा प्रशालेचे तालुकास्तरीय तायक्वाँडो स्पर्धेत यश

खेड - श्री समर्थ विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ येथील विद्यार्थ्यांनी तायक्वाँडो स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. रविवार दि.६ सप्टेंबर २०२६ रोजी श्री देवी काळकाई मंदिर भरणे आयोजित तायक्वाँदो स्पर्धेत शौर्य शिंदे, मुस्तफा सुर्वे, गीते बेलोसे, अनिकेत गोरे यांनी सुवर्ण पदक तसेच आराध्या जाधव, स्वरा शेलके, आरुष जाधव, श्लोक पाटील, आदित्य राईन, रुद्र खोपकर यांनी रौप्य पदक तर ओम कदम, ऋत्वान माने, सम्यक जाधव यांनी कांस्य पदक पटकावले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्राचार्य डॉ. एस.एस. अली, सीईओ डॉ.विजय रॉबर्ट, क्रिडा शिक्षिका रसिका पालांडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg