loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी ओवळीये वरचीवाडी येथे बंद घराची कौले काढून चोरट्यांचा प्रवेश, २ लाख ३० हजाराचे सोन्याचे दागिने लंपास

सावंतवाडी - ओवळीये वरचीवाडी येथे असलेल्या बंद घराची कौले काढून घरात प्रवेश करत कपाटाच्या चाव्या शोधून चोरट्याने दोन लाख तीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत कौस्तुभ सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात संशयितावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वान पथक याना पाचारण करण्यात आले मात्र चोरट्याचा मागमूस लागला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ओवळीये वरचीवाडी येथील कौस्तुभ सावंत हे सावंतवाडी मोती तलाव येथे नाश्ता सेंटर फूड ट्रक चालवत असून त्यांचे घर सकाळी बंद होते. ते सावंतवाडी येथे फूड ट्रकवर असताना मंगळवारी आई दुपारी १२.३० वा घरी गेली. तिने घरी जाऊन दरवाजा उघडून पाहिले असता घराच्या छपराच्या कौलातून संशयित चोरट्याने घरात प्रवेश केला व कपाटाच्या तिजोरीच्या चाव्या शोधून काढून आत ठेवलेले दोन लाख तीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

टाईम्स स्पेशल

याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी ठसेतज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले मात्र शोध लागला नाही. अधिक तपास पोलीस दिपक शिंदे करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg