loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत वेदांत पोफळे आणि आराध्या वाजंत्री यांची नेत्रदीपक कामगिरी!

मालवण(प्रतिनिधी)- सिंधुदुर्गच्या जिल्हा क्रीडा अधिकारी अंतर्गत क्रीडा दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कुलच्या विध्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले उद्या स्पर्धेत १७ वर्षीय मुलगे १०० मीटर फ्रीस्टाईल पोहणे या क्रीडाप्रकारात वेदांत विनायक पोफळे याने तसेच १७ वर्षीय मुलगे १०० मीटर फ्रीस्टाईल पोहणे यामध्ये १७ वर्षीय मुली १०० मीटर फ्रीस्टाईल पोहणे यामध्ये आराध्या बाळकृष्ण वाजंत्री हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ओरोस येथे जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांच्या वतीने जिल्हास्तरीय जळतरण स्पर्धा पार पडली. यामध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कुलचा विद्यार्थी वेदांत पोफळे हा १७ वर्षीय १०० मीटर फ्रीस्टाईल पोहण्याच्या स्पर्धेत सहभागी झाला होता. तर याच गटात या प्रशालेची आराध्या बाळकृष्ण वाजंत्री हि विद्यार्थिनी सहभागी झाली होती. या दोन्ही विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. जलतरण स्पर्धेत वराडकर हायस्कुलच्या इयत्ता आठवी मधील वेदांत पोफळे आणि आराध्या वाजंत्री यांनी प्रथमच जलतरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.

टाइम्स स्पेशल

या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक संजय पेंडूरकर, किसन हडलगेकर, भूषण गावडे तसेच प्रशिक्षक प्रवीण सुलोकर यांनी मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्यासह संस्थाचालक, मुख्याध्यापिका देवयानी गावडे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg