loader
Breaking News
Breaking News
Foto

पर्वरी पुलाचे नाम. नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्घाटन

पणजी, : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पोर्वोरिम येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सहा पदरी उन्नत मार्गाचे (एलिव्हेटेड कॉरिडॉर) उद्घाटन करण्यात आले. गोवा सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील हा सहा पदरी, पाच किलोमीटरहून अधिक लांबीचा उन्नत मार्ग सुमारे ६४१ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पर्वरी परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून, पणजी आणि उत्तर गोवा दरम्यानची वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुलभ होणार आहे. हा उन्नत मार्ग ११ सप्टेंबरपासून नियमित वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, विधानसभा अध्यक्ष डॉ. गणेश गावकर, उपसभापती जोशुआ डिसोझा, मत्स्यव्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर, ऊर्जा मंत्री रामकृष्ण ऊर्फ सुदिन ढवळीकर, कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो तसेच पर्यटन मंत्री रोहन खंवटे उपस्थित होते. यावेळी जीएफडीसीच्या अध्यक्षा व आमदार डॉ. देविया राणे, आमदार डिलायला लोबो, जीटीडीसीचे अध्यक्ष व आमदार केदार नाईक, गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष व आमदार जीत आरोलकर, आमदार कृष्णा दाजी साळकर, रुडॉल्फ फर्नांडिस, डॉ. चंद्रकांत शेट्ये, निलेश काब्राल, उल्हास तुयेकर तसेच राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे आणि माजी आमदार दामू नाईक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

तसेच मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, आयएएस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान मुख्य अभियंता संदीप प्रभू चोडणकर, जिल्हा पंचायत सदस्य, विविध ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी, मान्यवर नागरिक आणि अन्य अधिकारी यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पर्वरीमधील या आधुनिक सहा पदरी उन्नत मार्गामुळे गोव्याच्या रस्ते पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळणार असून, प्रवाशांचा वेळ वाचण्याबरोबरच उत्तर आणि दक्षिण भागातील संपर्कव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg