loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर याच्या मार्गदर्शन शिबीराला विदयार्थ्यांचा मोठा प्रतिसाद!

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय रेटेड बुद्धिबळपटू, राज्य पंच आणि प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर याने सावंतवाडीत घेण्यात आलेल्या विशेष बुद्धिबळ मार्गदर्शन शिबीरात विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. सावंतवाडी पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात विदयार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण येथील सव्वीस विदयार्थ्यांनी शिबीराचा लाभ घेतला. स्पर्धेचे उदघाटन सावंतवाडीतील ज्येष्ठ बुद्धिबळ खेळाडू चंद्रकांत रणशूर यांच्या हस्ते आणि मुंबईतील जनार्दन लक्ष्मण शिर्सेकर शिक्षण संस्थेच्या अनुपमा शेटगे, कुडाळ येथील समीर राऊळ, प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर, मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, सरचिटणीस स्नेहा पेडणेकर, आदि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चंद्रकांत रणशूर यांनी आपले अनुभव सांगून मुलांना बुद्धिबळ खेळण्याचे फायदे सांगितले. मुक्ताई ॲकेडमी सातत्याने मुलांसाठी घेत असलेल्या शिबीर, प्रशिक्षण आणि स्पर्धा, इत्यादि उपक्रमांचे कौतुक करतानाच कौस्तुभ पेडणेकर आणि मुक्ताई ॲकेडमीमुळे आज जिल्ह्यातील मुले राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त असल्याचे सांगितले. बाळकृष्ण हा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू आणि राज्य पंच झाला, हे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे रणशूर म्हणाले. समीर राऊळ यांनी आपला मुलगा मुक्ताई ॲकेडमीत कौस्तुभ पेडणेकर सरांच्या शिस्तबद्ध आणि बाळकृष्णच्या ॲडवान्स मार्गदर्शनाचा लाभ घेत असल्याचा आनंद व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

बाळकृष्णने शिबीरात ओपनिंग, मिडलगेम, एण्डगेम, टॅक्टिकल गेम, स्पर्धेचे नियम, इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. तसेच पुढील कालावधीत होणा-या शालेय तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेची मुलांकडून तयारी करुन घेतली. लवकरच कुडाळ, मालवण, वेंगुर्ला येथे विशेष बुद्धिबळ मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे बाळकृष्ण याने जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कौस्तुभ पेडणेकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg