loader
Breaking News
Breaking News
Foto

तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी ‘सचिन कोर्लेकर’ यांची पुन्हा वर्णी! ग्रामसभेत फेरनिवड; गावातील शांतता व सलोखा राखण्याची जबाबदारी पुन्हा खांद्यावर!

देवगड(प्रतिनिधी)- कोर्ले गावातील तंटे सामोपचाराने मिटवून सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राखण्यासाठी कार्यरत असलेल्या कोर्ले तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सचिन कृष्णा कोर्लेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रशासक सरपंच विश्वनाथ खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी निलेश पाताडे, उपसरपंच सुनील कांबळे, ग्रामपंचायत सदस्य शर्मिला बेळनेकर, माजी उपसरपंच बापू घाडी, अंगणवाडी सेविका सुरभी जांभेकर, आशा स्वयंसेविका सुकृती जैतापकर, दीपक कांबळे, जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व २ चे शिक्षक सोपान गवळी व स्वप्निल पाटील, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अजय भिसे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी कोर्लेकर यांची पुन्हा निवड होणे हे त्यांच्या कार्यावर ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे. गावातील विविध प्रश्नांवर संवादातून तोडगा काढणे, वाद टाळणे आणि ग्रामस्थांमध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी आगामी काळात समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावी काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. गावात वाद नको, संवाद हवा; तंटे नकोत, सलोखा हवा या भावनेतून कोर्ले गावात शांतता आणि सामाजिक एकोपा अधिक मजबूत करण्यासाठी तंटामुक्ती समिती कार्यरत राहणार आहे. सचिन कोर्लेकर यांच्या फेरनिवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg