रत्नागिरी: बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव स्व. राजेंद्र आयरे यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीने शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रत्नागिरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना स्व. राजेंद्र आयरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. प्रतिवर्षी राजेंद्र आयरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात येते. मात्र, त्यांच्या अचानक निधनामुळे आज त्यांच्या जयंतीनिमित्त हे शिबिर आयोजित करण्याची वेळ आपल्यावर आली, ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे. आयरे हे सामाजिक व राजकीय चळवळीतील एक आदर्शवत नेतृत्व होते. त्यांचे मार्गदर्शन व सहवास अजून मिळायला हवा होता. त्यांच्या समवेत काम करताना नेहमीच मोठी प्रेरणा मिळाली असून त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी आणि अजरामर ठरेल.
आज त्यांच्या जयंतीदिनी ज्या रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे, त्या रक्तामुळे अनेक गरजू रुग्णांना नवीन जीवनदान मिळेल आणि हेच आयरे साहेबांना दिलेले खरे श्रेष्ठदान ठरेल, असे भावुक मनोगत मिलिंद किर यांनी व्यक्त केले. या रक्तदान शिबिराला स्थानिक नागरिकांनी आणि रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठे सहकार्य केले. या कार्यक्रमास रत्नागिरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांच्यासह तैलिक समाज सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन लांजेकर, भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष रत्नदीप कांबळे, थिबा राजा कालीन संघर्ष समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिवेन कांबळे, ॲड. प्रवीण कांबळे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्र प्रभारी अनिकेत पवार, बसपा रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष राजेश सावंत, प्रभारी किशोर पवार, उपाध्यक्ष अनंत पवार, कोषाध्यक्ष दीपक आयरे, सचिव राकेश पवार, वाटद सेक्टरचे सुहास पवार, चांदेराई सेक्टरचे दीपक कांबळे, अशोक नगरचे महेश कांबळे, कल्पेश हातखंबेकर आणि मोहिते ॲम्ब्युलन्स सर्व्हिसचे किशोर मोहिते हे प्रमुख उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासकीय रक्तपेढीचे डॉ. सूरज निकम, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी मधुरा भोसले, डॉ. स्नेहा भोसले, इनचार्ज सुवर्णा जोशी, टेक्निशियन भारती भोसले, परिचारिका जयश्री कुंडलकर, दीप्ती जाधव आणि थूळ यांच्यासह संपूर्ण वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.