loader
Breaking News
Breaking News
Foto

रामचंद्र जोशी बुवा यांच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 16 सप्टेंबर रोजी कलगी - तुऱ्याच्या डबल बारी सामन्याचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा (मोंभार )गावचे सुपुत्र आणि ज्यांना 1975 ते 2000 या काळात मुंबईसह गुहागर तालुक्यात नावाजलेले शाहीर तसेच कलगी - तुरा, नमन लोककलेची परंपरा जपणारे आणि आपल्या कलागुणांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रतिभावंत लोकशाहीर रामचंद्र जोशी बुवा यांच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून कलगी - तुरा लोककलेचा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी रात्री ठीक 8:00 वाजता कलगी तुऱ्याच्या जंगी सामन्याचे जोशी बुवांचे निवासस्थानी गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा (मोंभार) येथे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाचेरी सडा मावळतवाडी येथील कलगीवाले शाहीर संतोषभाऊ आंब्रे विरुद्ध काजुर्ली गोणबरेवाडी येथील तुरेवाले शाहीर सुधाकर गोणबरे यांच्यामध्ये अटी - तटीचा सामना होणार असून या सामन्याला गुहागर तालुक्यातील जनतेने बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे एकरूप नवतरुण मित्र मंडळ, मोरेवाडी आणि जोशी कुटुंबाकडून करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg