रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सौ.उमा वामन बेडेकर लायन्स ब्लड स्टोरेज सेंटर चे लोकार्पण रविवारी, दि. ६ सप्टेंबर रोजी लायन्स नेत्र रुग्णालय, एमआयडीसी, रत्नागिरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ अलिमिया परकार यांच्या शुभहस्ते या रक्तसाठवण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध व्हावे, रक्तासाठी होणारी धावपळ कमी व्हावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने मदत मिळावी, या सामाजिक उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. लायन्स क्लबच्या ‘We Serve’ या सेवाभावी ब्रीदाला साजेसे हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.कार्यक्रमाला लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल लायन उदय लोढ,रिजन चेअरमन लायन डॉ. निलेश पाटील, झोन चेअरपर्सन लायन शिल्पा पानवलकर, डिस्ट्रिक्ट चेअरमन लायन उमेश पवार, तसेच ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अलिमिया परकार आणि यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष लायन डॉ. संतोष बेडेकर, कार्याध्यक्ष लायन डॉ. शैलेन्द्र भोळे,सचिव लायन पराग पानवलकर,कोषाध्यक्ष लायन विपिन शहा तसेच लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष लायन सुमित ओसवाल,सचिव लायन ललित शहा,खजिनदार लायन प्रदीप हरिचकर आणि सर्व लायन्स सदस्यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.सौ. उमा वामन बेडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात आलेले हे रक्तसाठवण केंद्र रत्नागिरी जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.








































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.