loader
Breaking News
Breaking News
Foto

आयी रस्त्यावर पडलेल्या खड्डयाकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांनी लावला फलक `रस्ता चांगला आहे, सावकाश जावा`

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - गणेश चतुर्थी सण जवळ आला आहे. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, रस्ते निर्माण विभाग याना सूचना देऊन देखील प्रशासनाचा वचक नाही. यामुळे अधिकारी, ठेकेदार काम करत नाही. दोडामार्ग ते आयी रस्त्यावर बाजारपेठमध्ये काही ठिकाणी खड्डे पडले आहेत, यात पाणी साचून ते पाणी वाहन गेल्यावर दुकानात, घरात उडते किंवा दुचाकी पादचारी यांच्या अंगावर उडते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बांधकाम विभाग याना कल्पना देऊन देखील खड्डे बुजवले नाही. यामुळे स्थानिकांनी लक्ष वेधण्यासाठी चक्क खड्ड्यात "रस्ता चांगला आहे, सावकाश जावा" असा फलक लावला. सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या ताब्यात हा रस्ता येतो. दोडामार्ग-आयी रस्त्यावर दोडामार्ग बाजारपेठमध्ये खड्डे पडले आहेत. वेळीच दुरुस्ती केली जात नाही. या ठिकाणी डांबर, खडी टाकून खड्डे बुजवा, अशी मागणी करुन देखील लक्ष नाही. यामुळे स्थानिकांनी खड्यात फलक लावून लक्ष वेधले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg