loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलचे शिक्षक ॲड. प्रा. बाळासाहेब राऊत यांना ‘आदर्श गुरुवर्य सन्मान पुरस्कार’ प्रदान

खेड (प्रतिनिधी) - भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर रोजी देशभरात 'शिक्षक दिन' साजरा केला जातो. याच शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी व आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना यांच्या तर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्यात रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमधील शिक्षक ॲड. प्रा. बाळासाहेब राऊत यांना ‘आदर्श गुरुवर्य सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिक्षण क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत ॲड. प्रा. राऊत यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे ॲड. प्रा. राऊत हे रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमधील विद्यार्थी व सहकाऱ्यांमध्ये आपुलकीचे स्थान निर्माण करणारे शिक्षक आहेत. शैक्षणिक कार्यासोबतच विविध शालेय उपक्रमांमध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.

टाईम्स स्पेशल

ॲड. प्रा. राऊत यांना ‘आदर्श गुरुवर्य सन्मान पुरस्कार’ प्राप्त झाल्याचे समजताच रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रोटरी स्कूलचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ॲड. प्रा. राऊत यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg