loader
Breaking News
Breaking News
Foto

मुचरी गटात भक्तिमय वातावरणात भव्य मंगळागौर; आणि ‘स्मार्ट श्रावण सखी’ स्पर्धेलाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संगमेश्वर / सत्यवान विचारे - श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व, हिंदू संस्कृतीतील मंगलमय परंपरा आणि महिलांच्या पारंपरिक कलागुणांचा सुंदर संगम साधत मुचरी जिल्हा परिषद गटात भव्य मंगळागौर व ‘स्मार्ट श्रावण सखी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीने तसेच पालकमंत्री मा. उदय सामंत आणि आमदार मा. किरण सामंत यांच्या सहकार्याने लोवले येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळागौर स्पर्धेत मुचरी गटातील तब्बल ११ महिला संघांनी सहभाग घेतला. विविध पारंपरिक खेळ, नृत्य, धार्मिक भावनेने सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामूहिक सादरीकरणाने स्पर्धेला विशेष रंगत आली. स्पर्धेत अंत्रालदेवी कानरकोंड संघाने प्रथम क्रमांक पटकावला. श्रीराम वनीवंत महिला ग्रूप, कानरकोंड यांनी द्वितीय क्रमांक मिळविला, तर श्री स्वामी समर्थ मंगळागौर संघ, लोवले पडयेवाडी यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

टाइम्स स्पेशल

याच कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘स्मार्ट श्रावण सखी’ उपक्रमात सुमारे ४० महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत ऋतुजा कदम यांनी प्रथम, तर दळी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. श्रावणातील धार्मिक-सांस्कृतिक परंपरा, महिलांचे कलागुण, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू या उपक्रमातून अधोरेखित झाले. कार्यक्रमाला रत्नागिरी तालुका शिवसेना महिला तालुका प्रमुख कांचन नागवेकर, जिल्हा परिषद सदस्या माधवी गीते, पंचायत समिती सभापती सौ. शर्वरी वेल्ये, पंचायत समिती सदस्या आरुषी घवाळी, सुहास मायगडे, संदीप रहाटे, आतिष पाटणे, मनोहर गीते, माभळेचे सरपंच मनोहर जाधव, महेश सामंत, मोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg