loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनेतारण आर्थिक फसवणूकीतील पीडितांच्या पाठीशी खंबीर, भाजप जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्याकडून मदतीचा दिलासा

मालवण (प्रतिनिधी) - मुथुट फिनकॉर्प मालवण शाखेतील कर्मचारी व इतरांकडून कथित सोनेतारण आर्थिक फसवणूक व गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणात पीडित मच्छीमार महिला आणि नागरिकांची बैठक मालवण धुरीवाडा येथील संस्कार हॉलमध्ये झाली. भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी बैठकीला उपस्थित राहून पीडितांच्या व्यथा जाणून घेतल्या. महिलांच्या बाबतीत झालेली ही फसवणूक गंभीर असून एक महिला म्हणून आपण पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन यावेळी श्वेता कोरगावकर यांनी दिले. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे १२० मच्छीमार महिला आणि इतर नागरिकांची फसवणूक झाल्याचा दावा या बैठकीत करण्यात आला. तसेच सुमारे नऊ किलोपर्यंत सोने वित्तीय संस्थेत अडकले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. आणखी काही नागरिक तक्रारी नोंदविण्यासाठी पुढे येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पीडित महिलांनी बैठकीत आपल्यासोबत घडलेल्या कथित प्रकाराची माहिती देत आर्थिक अडचणी आणि झालेल्या नुकसानीची व्यथा मांडली. श्वेता कोरगावकर यांनी पीडितांशी संवाद साधून त्यांना कायदेशीर मार्गदर्शन केले. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्क साधून भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पीडित महिलांशी प्रत्यक्ष भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच महिला आयोगाकडे दाद मागण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. बैठकीनंतर श्वेता कोरगावकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस उपअधीक्षक नयोमी साटम यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रकरणातील तपासाची सद्यस्थिती आणि पुढील कार्यवाहीबाबत माहिती जाणून घेतली.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, पीडित महिलांनी मालवण येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्या लढ्याला पाठिंबा दिल्याबद्दल श्वेता कोरगावकर यांचे आभार मानले. बैठकीला भाजपच्या नगरपालिका गटनेत्या अन्वेषा आचरेकर, माजी महिला व बालकल्याण सभापती पूजा सरकारे, श्रमजीवी रापण संघाचे दिलीप घारे, मुख्य तक्रारदार व कोळंब सरपंच सिया धुरी, कविता मोंडकर, रुपेश प्रभू, दाजी जोशी, माधुरी प्रभू, नगरसेवक रविकिरण तोरसकर, कायदेशीर सल्लागार तसेच मोठ्या संख्येने पीडित मच्छीमार महिला व नागरिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg