loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग - वीजघर- वायंगणतड येथे मुख्य मार्गावर ‘मलमपट्टी’ ठरतेय धोकादायक! रस्त्याच्या कडेला चिखलाचे साम्राज्य

तिलारी (प्रतिनिधी), - गणेशचतुर्थी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना दोडामार्ग - वीजघर मुख्य मार्गावरील वायंगणतड येथे खड्डे बुजवण्याच्या कामानंतर निर्माण झालेला चिखलाचा प्रश्न वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. खड्डे बुजवून रस्त्याची डागडुजी करण्यात आली असली, तरी रस्त्याच्या एकाकडेला मोठ्या प्रमाणात माती साचल्याने पावसात त्याचे चिखलात रूपांतर झाले आहे. हा चिखल रस्त्यावर येत असून वाहनचालकांना त्यातून मार्ग काढावा लागत आहे. विशेषतः गणेशचतुर्थीसाठी गावाकडे येणार्‍या चाकरमान्यांची आणि वाहनांची संख्या पुढील दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रस्त्याच्या कडेला असलेला हा चिखल दुचाकीस्वारांसाठी मोठा धोका ठरू शकतो. खड्डे बुजवण्याच्या कामामुळे रस्ता सुरक्षित होण्याऐवजी अपघाताचा धोका दुप्पट वाढला आहे का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने या ठिकाणी पाहणी करून साचलेली माती व चिखल हटवावा आणि रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. दरम्यान, संबंधित रस्ते निर्माण व देखभाल करणार्‍या एजन्सीने केलेल्या कामाची पीडब्युडी कडून पाहणी झाली आहे का ? कामाची गुणवत्ता तपासली आहे का ? आणि चिखल हटवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची ? याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg