loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रावणाच्या साजाला फॅशनचा तडका; ‘द रॉयल-श्रावण व्होग’मध्ये कलागुणांचा जल्लोष

पनवेल (प्रतिनिधी) : गार्गीज् ग्रुप आयोजित आणि आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान, रंगनील क्रिएशन्स तसेच इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी, न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘द रॉयल-श्रावण व्होग, पनवेल फॅशन वीक सीझन-३, २०२६’ हा भव्य फॅशन सोहळा सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह, पनवेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. श्रावणाच्या पारंपरिक साजाला आधुनिक फॅशनची जोड देत फॅशन, आत्मविश्वास, टॅलेंट, ग्लॅमर आणि स्टाईलचा सुरेख संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नवोदित कलाकार, मॉडेल्स, मेकअप आर्टिस्ट आणि बालकलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम विशेष ठरला. विजेत्यांचा सन्मानही आकर्षक पद्धतीने करण्यात आला.े या कार्यक्रमास नगरसेविका स्नेहल ढमाले -पाटील, मोहिनी विक्रांत पाटील आणि छायाताई बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विशेष अतिथी म्हणून डॉ. सुप्रिया सहस्रबुद्धे, डॉ. जया गुर्साळे, डॉ. जयश्री पाटील, डॉ. केतकी पाटील म्हस्के,माधुरी गोसावी आणि सौ. राजश्री सोनी उपस्थित होत्या. मोफत प्रवेशासोबतच प्रेक्षकांसाठी विविध आकर्षक बक्षिसे आणि सरप्राईजेस ठेवण्यात आल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रावणाच्या सांस्कृतिक परंपरेला आधुनिक फॅशनची जोड, नवोदितांना आपल्या कलागुणांचे व्यासपीठ, विजेत्यांना सन्मान आणि प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देणारा ‘द रॉयल-श्रावण व्होग पनवेल फॅशन वीक सीझन-३’ हा सोहळा पनवेलच्या सांस्कृतिक आणि फॅशन विश्वात संस्मरणीय ठरला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg