loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर येथे रेल्वे ट्रॅकवर तरुणाचा मृतदेह; रेल्वेच्या धडकेने अपघात झाल्याचा संशय

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील परचुरी-वेल्येवाडी येथील रेल्वे टनेल (बोगदा क्रमांक १८२) जवळ रेल्वे ट्रॅकवर एका तरुणाचा मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत मिळून आल्याची घटना घडली आहे. रेल्वेची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस नोंदीनुसार, पातीराम काशिराम (वय ३० वर्ष, मूळ रा. झाशी, लुहारी, उत्तर प्रदेश) असे मृत आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (८ सप्टेंबर २०२६) पहाटेच्या सुमारास परचुरी गावचे पोलीस पोलीस पाटील सुधीर सिताराम गुरव यांनी या घटनेबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात माहिती दिली. रेल्वे ट्रॅकवर परप्रांतीय तरुणाचा मृतदेह उताण्या स्थितीत पडलेला होता. रेल्वेची धडक इतकी भीषण होती की, अपघातात तरुणाचा उजवा हात तुटला असून शरीरावर गंभीर दुखापती झाल्यामुळे अतिरक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

टाईम्स स्पेशल

या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यूची (ए.एम.आर. क्र. ३६/२०२६) नोंद करण्यात आली आहे. संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg