loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगडच्या मुकुंदराव फाटक नर्सिंग महाविद्यालयात ज्योत प्रज्वलन व शपथग्रहण समारंभ उत्साहात साजरा!

देवगड(प्रतिनिधी)- नोकरीच्या सर्व संधी कमी कमी होत जातील. पण नर्स (परिचारिका)च्या संधी देशामध्ये व परदेशात देखील भविष्यात वाढतच राहतील. तुम्ही एक ठोकळा म्हणून आलात पण जाताना एक शिल्प बनून जाल. असा विश्वास तंबाखू मुक्त सिंधुदुर्गचे प्रणेते डॉ अनिल नेरुरकर यांनी व्यक्त केला. सुनिता शांताराम जठार एज्युकेशन ट्रस्ट संचलित मुकुंदराव फाटक नर्सिंग महाविद्यालय देवगडच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना ज्योत प्रज्वलन व शपथग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ट्रस्टचे अध्यक्ष व आम. प्रमोद जठार महाराष्ट्र नर्सिंग सिनेट सदस्य डॉ. मिलिंद काळे, अ‍ॅड. अजितराव गोगटे, डॉ. शिवप्रसाद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ढाले, महादेव कानडे, जयंत मनेरकर, नीरजा जठार, महेश खोत, रामदास बोरकर, श्रावणी मधभावे, वैशाली मनेरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नर्सिंग ही एक छान संधी आहे. असे सांगून डॉ अनिल नेरूरकर यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत रुग्णाची सेवा करण्याची एक कौशल्य तुमचा हाती असणार आहे. पुढील तीन वर्षात आपण हे शिकताना जगाच्या सर्व पातळीवर तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळणार आहे.रुग्णाबरोबर बोलणे हसणे यातून तुम्ही एका कुटुंबाचा आधार असलेल्या व्यक्तीला नवीन जीवन देणार आहात .त्यासाठी भाषेची अडचण येऊ नये म्हणुन अन्य भाषा देखील आत्मसात कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र नर्सिंग सिनेटचे डॉ मिलिंद काळे यांनी विद्यार्थांना सल्ला देताना नर्सिंग अभ्यासक्रमात सुरुवातीलाच शपथ दिली जाते. अन्य व्यवसाय अभ्यासक्रमात पदवी नंतर शपथ दिली जाते. आजपासून तुम्ही मानवतेची सेवा करण्यास आपलं आयुष्य समर्पित केले असून यापुढे ज्ञान, कौशल्य, करून, शिस्तपणा, नैतिकता या पाच मंत्राचा सदैव वापर करून यश संपादन करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

आम. प्रमोद जठार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा गेल्या काही वर्षा पासून शिक्षणामध्ये प्रगती साधत असून पुढील काही वर्षात शिक्षणाचे एक प्रमुख केंद्र बनेल. नर्सिंगच्या माध्यमातून तुम्ही नवीन क्षितिजाकडे वाटचाल चालू केली आहे. भारत जगात चौथी महासत्ता निर्माण होत असून विद्यार्थांचे योगदान त्यामध्ये निश्चित अधोरेखित करणारे असेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मेणबत्तीवर हात ठेऊन विद्यार्थांनी शपथ घेतली. प्राचार्य डॉ. ढाले यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात महाविद्यालयाचा आढावा घेऊन समाजातील दानशूर व मदत करणार्‍यांना धन्यवाद दिलेत. यावेळी विद्यार्थी कौस्तुभ सकपाळ, सावली परब यांनी मनोगत व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg