लांजा (संजय साळवी) : मुंबई - गोवा महामार्गावरील आंजणारी पुलाजवळ भरधाव वेगाने जाणारा १२ चाकी टाटा ट्रक पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार ४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चालकाचे नाव श्याम सिंह (वय ५८, रा. सुकर्ताल, शहारनपूर, राज्य उत्तर प्रदेश) असे आहे. श्याम सिंह हा आपल्या ताब्यातील ट्रक (क्र. एचआर. ३८. एक्स. ०९९३) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने स्लायडींग घेऊन जात होता. तो आंजणारी पुलाजवळ आला असता पुलाच्या अलीकडील रस्ता उताराचा असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण गमावल्याने ट्रक पलटी झाला.
या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच ट्रकमधील क्लिनर संदीप कृष्णलाल कुमार (४१ वर्षे, रा. विकसनगर रोड, मरवा, बेहट, सहारनपूर, राज्य उत्तरप्रदेश) याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापती झाल्या असून ट्रक व ट्रकमधील मालाचेही नुकसान झाले. या प्रकरणी क्लिनर संदीप कृष्णलाल कुमार याच्या फिर्यादीवरून चालकाने भरधाव वेगाने व हयगयीने ट्रक चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस करत आहेत.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.