पनवेल :- नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून, पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांसह वाहतूक शाखेतही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील तरतुदींनुसार आयुक्तालय स्तरावर हे आदेश काढण्यात आले आहेत.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांतर्गत करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये मपोनि अश्विनी संतोष पाटील यांची उलवा पोलीस ठाण्यातून आरबीआय सुरक्षा शाखेत, मपोनि मोहिनी प्रशांत लोखंडे यांची वाहतूक शाखेतून तुभे पोलीस ठाण्यात, पोनि औदुंबर भालचंद्र पाटील यांची वाहतूक शाखेतून गुन्हे शाखेत, तर पोनि निरज पंजाबराव चौधरी यांची बी.डी.डी.एस.मधून सुरक्षा शाखेत बदली करण्यात आली आहे. दरम्यान, वाहतूक विभागातील कार्यरत अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. पोनि महेशुकुमार प्रल्हाद सरतापे यांची पनवेल शहर वाहतूक शाखेत, पोनि सुभाष शंकर पुजारी यांची नवीन पनवेल वाहतूक शाखेत, तर पोनि रेवणासिद्ध तुकाराम ठोंगले यांची सिवूड्स वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोउपनि सुभाष पावजी कोकणे यांची पोलीस उपआयुक्त, वाहतूक वाचक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
पनवेल आणि नवीन पनवेल परिसरातील वाढती वाहतूक लक्षात घेता पनवेल शहर वाहतूक शाखा आणि नवीन पनवेल वाहतूक शाखेत नव्या पोलीस निरीक्षकांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. यामुळे वाहतूक कोंडी, नियमभंग आणि रस्ते सुरक्षेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होऊन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.