loader
Breaking News
Breaking News
Foto

नारळ-सुपारीच्या बागेत आता पिकणार 'काळे सोने'! वणौशीत काळीमिरी लागवडीचा यशस्वी धडा

दापोली (सागर गोवळे) - ​वणौशीच्या समृद्ध भूमीत आता नारळ आणि सुपारीच्या साथीने 'काळे सोने' म्हणजेच काळ्या मिरीची भरघोस शेती बहरणार आहे. कृषी महाविद्यालय, दापोलीच्या 'कृषी स्नेही' गटातर्फे आयोजित 'ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमा' अंतर्गत शेतकऱ्यांना आंतरपिकाचे शास्त्रोक्त धडे देण्यात आले. नारळ, सुपारी, पांगारा आणि सिल्व्हर ओकच्या उपलब्ध झाडांचा आधार घेऊन मर्यादित जागेत काळ्या मिरीचे आंतरपीक कसे घ्यावे, याचे प्रत्यक्ष गणित शेतकऱ्यांसमोर मांडण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​वेलींची शास्त्रीय ओळख: ​ऑर्थोट्रॉपिक वेल: झाडांवर थेट उंच चढण्यासाठी, रनर्स वेल: जमिनीवर पसरणारी, नवीन सशक्त रोपे जलद तयार करण्यासाठी, ​प्लाजिओट्रॉपिक फांद्या: कुंड्यांमध्ये आकर्षक 'बुश पेपर' पिकवण्यासाठी. ​'पन्नियुर-१' ची लागवड: गोपाळ परांजपे यांच्या बागेत कोकणात सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या 'पन्नियुर-१' या उन्नत वाणाची शास्त्रोक्त पद्धतीने (सुपीक माती, शेणखत व सिंगल सुपर फॉस्फेटचे मिश्रण वापरून) लागवड करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

गोपाळ परांजपे आणि विजया गुरव यांच्या बागेत पार पडलेल्या या प्रात्यक्षिकाला स्थानिक १० प्रयोगशील शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कमी खर्चात जमिनीची सुपीकता वाढवून बागांमधून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा एक नवा मार्ग या उपक्रमामुळे वणौशीतील शेतकऱ्यांना मिळाला आहे. ​सदर कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, डॉ. अशोक चव्हाण, डॉ. विजय देसाई, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg