loader
Breaking News
Breaking News
Foto

ऐतिहासिक यश! बॅडमिंटन स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा डंका

रत्नागिरी (जमीर खलफे) : दि. ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई विद्यापीठ मुंबई आणि एस. एम. शेट्टी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालय (स्वायत्त), पवई , मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठ पुरुष व महिला बॅडमिंटन आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन कालिदास क्रीडा संकुल, मुलुंड येथे करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोंकण विभागाचे प्रतिनिधित्व करताना आणि कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळीत श्रुति फणसे हिने उत्कृष्ट खेळ करीत संघाला आणि कोंकण विभाग व महाविद्यालयासाठी सलग दुसर्‍या वर्षी मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन महिला बॅडमिंटन स्पर्धेतील दुसरे रौप्य पदक पटकावले आणि स्पर्धेचे सांघिक उपविजेतेपद प्राप्त केले. महाविद्यालयाच्या तसेच कोंकण विभाग महिला बॅडमिंटन संघाला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, अब्दुलसमद शेख यांचे मार्गदर्शन लाभले व माधव फणसे, क्रीडा शिक्षक प्रा.कल्पेश बोटके यांचे सहकार्य लाभले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg