loader
Breaking News
Breaking News
Foto

महसूल, राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला अधिकार्‍यांचा ’क्लास’, दापोली पंचायत समितीची आमसभा तब्बल ६ तास

रत्नागिरी, (चंद्रशेखर जोशी ) : चौकशी करायला अधिकार्‍यांना तीन-तीन वर्षे लागतात? असा ढिम्म कारभार खपवून घेतला जाणार नाही. चुकीची कामे करणार्‍या अधिकार्‍यांवर थेट कारवाई केली जाईल, असा कडक इशारा गृह(शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला. पंचायत समिती दापोलीची आमसभा कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तब्बल सहा तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत जनतेच्या विविध प्रश्नांवरून राज्यमंत्री योगेश कदम यांनी अधिकार्‍यांचा चांगलाच ’क्लास’ घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आमसभेला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती उन्मेष राजे, उपसभापती नम्रता तोडणकर, नगराध्यक्ष कृपा घाग, प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांच्यासह जिल्हा परिषद व पं.स. सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्त्यांवरील खड्डे निकषानुसारच भरले पाहिजेत, असे स्पष्ट करत राज्यमंत्री म्हणाले, तसेच स्मार्ट मीटर आणि पी एम सूर्यघर योजना, एसटी प्रशासन व इतर समस्या, आंबा-काजू हमीभाव, जलजीवन मिशन, महसूल, वनविभाग, आरोग्य, भूमी अभिलेख आणि पोलीस यंत्रणेशी संबंधित प्रश्नांवर अधिकार्‍यांना जाब विचारण्यात आला. आमसभेत उपस्थित झालेल्या सर्व समस्या आणि मागण्यांवर संबंधित खात्यांनी येत्या सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश शेवटी राज्यमंत्र्यांनी दिले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg