बांदा (प्रतिनिधी) - असनिये येथे गावठी बनावटीची बंदूक आणि नऊ जिवंत काडतुसे जप्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही संशयितांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांच्या तपासात आणखी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांना ताब्यात घेण्यासाठी बांदा पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
सावंतवाडी पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बांदा पोलिसांनी असनिये-वायंगणवाडी येथे छापा टाकून जयेंद्र अनिल सावंत (वय २७) याला गावठी बनावटीची बंदूक आणि नऊ जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून या बंदुकीच्या पुरवठ्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी प्रसाद प्रभाकर कुबल (वय ४३, रा. नेतर्डे) याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून राजू गोपाळ पाटील (वय ३३, रा. कासारवर्णे, पेडणे-गोवा) याचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली होती. पोलीस कोठडीदरम्यान संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. तसेच जयेंद्र सावंत आणि प्रसाद कुबल यांच्या घरांची झडती घेण्यात आली. मात्र, तेथे अन्य आक्षेपार्ह मुद्देमाल आढळला नाही. बंदुकीच्या पुरवठ्याचा माग काढताना पोलिसांनी प्रसाद कुबल याला सावंतवाडी-माजगाव येथील बंदूक तयार करणार्या ठिकाणी नेऊन घटनाक्रमाची पडताळणी केली होती.
दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांना आणखी दोन संशयितांची माहिती मिळाली असून, त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. मात्र, हे दोघे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, त्यांचा शोध सुरू आहे. हे दोन्ही संशयित पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांच्याकडून मिळणार्या माहितीतून या बंदूक प्रकरणातील त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट होणार आहे. तसेच बंदुकीचा पुरवठा आणि नऊ जिवंत काडतुसे नेमकी कुठून आली, याबाबतही अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणाचे जाळे आणखी कुठपर्यंत पसरले आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. संशयितांचे मोबाईल रेकॉर्ड तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तपासली जात असून, गोवा व सिंधुदुर्ग परिसरात अशा प्रकारच्या बेकायदा बंदुकांचा पुरवठा करण्यात आला आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे पुढील काळात या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.