loader
Breaking News
Breaking News
Foto

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर पनवेल शहर वाहतूक शाखा व आरटीओची संयुक्त विशेष कारवाई

पनवेल : पनवेल शहरात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर पनवेल शहर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने विशेष रिक्षा कारवाई मोहीम राबविण्यात आली. दिनांक 05/09/2026 रोजी सकाळी 09.30 ते 11.30 वाजेपर्यंत पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, पनवेल शहर वाहतूक शाखा व अनिल गेळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संयुक्त कारवाई करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विशेष मोहिमेदरम्यान फ्रंट सीट बसविणे, गणवेश न घालणे, मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. एकूण 166 रिक्षांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण ₹2,77,650/- इतका दंड आकारण्यात आला. सदर कारवाईदरम्यान पनवेल शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

पनवेल शहरातील नागरिकांची सुरक्षितता व वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने यापुढेही पनवेल शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी अशाच प्रकारच्या विशेष रिक्षा तपासणी व कारवाई मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. रिक्षाचालकांनी प्रवाशांची सुरक्षितता व सुविधा लक्षात घेऊन वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत, गणवेश परिधान करावा आणि मीटरप्रमाणे भाडे आकारावे, असे आवाहन यानिमित्ताने यावेळी वाहनचालकाना पोलिसामार्फत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg