संगमेश्वर (सत्यवान विचारे) : पदवीधर शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सध्या रत्नागिरी जिल्ह्यात चांगलाच तापला असून, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेल्या मार्गदर्शन पत्रामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिंधुदुर्गला पाठविण्यात आलेल्या पत्रात मंजूर पदवीधर शिक्षकांचे विषयानुसार वर्गीकरण न करता, संबंधित शाळेवर पदवीधर शिक्षक म्हणूनच समायोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याचे पत्रावरून दिसून येते. दि. १८ जून २०२६ रोजीच्या या पत्रात, पवित्र प्रणालीतून सरळसेवेने नियुक्त झालेल्या काही पदवीधर शिक्षकांच्या समायोजनासंदर्भात मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यावर शिक्षण विभागाने मंजूर पदवीधर शिक्षकांचे विषयानिहाय वर्गीकरण न करता शाळेवर पदवीधर शिक्षक पदावरच समायोजन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. संबंधित शिक्षकास पूर्वी कार्यरत असलेल्या शाळेवर ठेवता येईल किंवा दुसर्या शाळेवर पदवीधर शिक्षक म्हणून समायोजन करता येईल, असेही पत्रात नमूद असल्याचे दिसते. मात्र, याच धर्तीवरील भूमिका रत्नागिरी जिल्ह्यात का घेतली जात नाही? असा सवाल प्राथमिक शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक शिक्षकांनी गेली २० ते २५ वर्षे पदवीधर शिक्षक म्हणून सेवा बजावली आहे. अशा कार्यरत पदवीधर शिक्षकांना त्यांच्या विद्यमान पदाचा अनुभव आणि सेवा ज्येष्ठता विचारात न घेता उपशिक्षक पदावर आणले जात असल्याची शिक्षकांची तक्रार आहे. ही आमच्या सेवेची कदर आहे की आमच्यावर दाखविलेला अविश्वास? असा सवाल संबंधित शिक्षकांमध्ये उपस्थित होत आहे. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, एकीकडे वर्षानुवर्षे पदवीधर म्हणून अध्यापन करणार्या शिक्षकांना पदवीधर पदापासून दूर केले जात असताना, दुसरीकडे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नव्याने पदवीधर शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे या प्रक्रियेबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेतील आणखी एक गंभीर बाब शिक्षकांकडून मांडली जात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी एकच पदवीधर शिक्षक उपलब्ध राहण्याची शक्यता आहे. शिक्षकांच्या माहितीनुसार, अशा सुमारे ६०० शाळांमध्ये एका नव्या पदवीधर शिक्षकावर संबंधित वर्गातील सर्व विषयांच्या अध्यापनाची जबाबदारी येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम होणार नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सेवा ज्येष्ठ शिक्षकांना डावलून केंद्रप्रमुख तसेच विस्तार अधिकारी पदांच्या पदोन्नतीबाबत यापूर्वीही शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता पदवीधर शिक्षकांच्या समायोजनाचा मुद्दा त्यात नव्याने भर पडल्याने शिक्षण विभागाच्या निर्णयप्रक्रियेबाबत शिक्षकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. शिक्षकांचा थेट सवाल आहे की, शिक्षण संचालक कार्यालयाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला पदवीधर शिक्षकांचे विषयानुसार वर्गीकरण न करता पदवीधर पदावरच समायोजन करण्याबाबत मार्गदर्शन केले असेल, तर त्याच प्रशासकीय मार्गदर्शनाचा आधार रत्नागिरी जिल्ह्यात का घेतला जात नाही? या प्रश्नाचे उत्तर जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभागाने स्पष्ट करावे, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. पदवीधर शिक्षकांचा अनुभव, सेवा ज्येष्ठता आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विचार करून समायोजनाची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.