loader
Breaking News
Breaking News
Foto

दहीहंडीच्या उत्साहात हेल्प ग्रुपचा सामाजिक बांधिलकीचा जागर!

कुडाळ : पारंपरिक दहीहंडीचा उत्साह, गोविंदांचा जल्लोष आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश अशा उत्साही वातावरणात हेल्प ग्रुप कुडाळ यांच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार प्रमोद जठार यांची उपस्थिती लाभली. यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी दहीहंडी हा केवळ उत्सव नसून आपल्या समृद्ध संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांचे विचार आणि समाजाला दिलेला संदेश आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने हेल्प ग्रुपच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचा सत्कार करण्यात आला. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत ‘प्लास्टिकमुक्ती’चा संदेश देण्यात आला. आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते नागरिकांना कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. तसेच छत्र्यांचेही वाटप करण्यात आले. उत्सवात सहभागी झालेल्या विविध गोविंदा पथकांचा आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

गोविंदांच्या जल्लोषाने आणि दहीहंडीच्या उत्साहाने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि सामाजिक उपक्रमांची सांगड घालत हेल्प ग्रुपने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी हेल्प ग्रुपचे बंड्या सावंत, संग्राम यांच्यासह पदाधिकारी, सभासद, गोविंदा पथकांचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg