loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रृंगारतळी बाजारपेठ पूल मार्केट दहीकाला उत्सव उत्साहात साजरा

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी बाजारपेठ पूल मार्केट दहीकाला उत्सव मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्रृंगारतळी बाजारपेठ पूल मार्केट येथे सकाळी श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. जानवळे गावचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. कमलाकर वणगे महाराज यांनी मंत्रांजली तसेच श्रीकृष्ण अवतारलीलां गीतांचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमासाठी ज्या देणगीदारांनी सहकार्य केले या सर्वांचे सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच आभार मानण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष सुभाष रजपूत, दत्ताराम कोंडविलकर, विनोद जानवळकर, रामचंद्र देवळेकर, जितेंद्र शिरगावकर, कीर्तनकार ह.भ. प. कमलाकर वणगे महाराज, वसंत जानवळकर, महेश आवेरे, मनोहर कलंबटे, विठ्ठल घाणेकर, प्रशांत शिरगावकर आणि मित्रपरिवार यांनी मेहनत घेतली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg