रत्नागिरी (जमीर खलफे) : आयडियल एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी (IEWS) संचलित अझीझा दाऊद नाईक हायस्कूल, रत्नागिरी येथे शिक्षक दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि कृतज्ञतापूर्वक वातावरणात संपन्न झाला. मुनीर शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास अश्रफ नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिक्षकांचे योगदान, गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक आणि विविध पुरस्कारांचे वितरण असा त्रिवेणी संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला. कार्यक्रमाची उद्दिष्टे इयत्ता दहावी (अ) ची विद्यार्थिनी कुमारी झैनब मुनाफ गुहागारकर हिने मांडली. यानंतर कुमार खोपेकर अर्श ऐजाज (उर्दू), कुमारी मुजावर लायबा उबैद (मराठी) आणि कुमारी जिवाजी सिद्रा ए. करीम (इंग्रजी) यांनी आपापल्या भाषेत मनोगत व्यक्त करत शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या पारितोषिक वितरण समारंभात एस.एस.सी. बोर्ड परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
संयुक्त प्रथम क्रमांक: ठाकूर आयेशा झहूर व मुकादम नुसरत इप्सान (प्रत्येकी ९४.००%), तृतीय क्रमांक: बुडये रैना सुहैल अली (९२.२०%) याशिवाय, कै. श्री. अली आय. काझी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भाषा विषयात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान झाला: उर्दू व मराठी: ठाकूर आयेशा झहूर (उर्दू - ९७ गुण, मराठी - ९४ गुण) इंग्रजी: माजगावकर अरिशा मुख्तार (९७ गुण) शाळेतील समर्पित सेवेबद्दल खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले: सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार: काझी हुब्साना हनीफ (शेख हसन नाईक प्री-प्रायमरी स्कूल) आणि शगुफ्ता अरफात वस्ता (अझीझा दाऊद नाईक हायस्कूल). सहाय्यक सेवकवर्ग पुरस्कार: प्रिती संजय दाफळे (माजी सरचिटणीस कै. लायन ए. करीम काझी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ).
शिक्षक दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अध्यापन करत शाळेचे कामकाज सांभाळले. या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अत्तार महवीन मोहसीन हिची ‘उत्कृष्ट शिक्षक’ म्हणून निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष खलील नाईक यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे, तर नाझीर नाईक, निसार नाईक, झहूर हकीम, तन्वीर काझी, मुदस्सर मुकादम आणि खदीजा प्रधान यांनी संदेशांद्वारे शुभेच्छा दिल्या. अध्यक्षांनी शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन होडेकर अनम अल्ताफ हिने केले, तर ठाकूर झोया जमीर हिने उपस्थितांचे आभार मानले.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.