सावंतवाडी (प्रतिनिधी): आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता प्रशालेच्या अर्जुन सावंत सभागृहात 'माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळाच्या माध्यमातून १९७९ मध्ये या शाळेची स्थापना झाली. तत्पूर्वी माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दूरवर जावे लागत असे. परंतु स्थानिक नागरिकांच्या पुढाकारामुळे आरोस, साटेली, तळवणे, मळेवाड, दांडेली आणि सातार्डा या गावांतील विद्यार्थ्यांना परिसरातच शिक्षणाची सोय उपलब्ध झाली.
गेल्या अनेक दशकांत संस्थेने शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासात मोठे योगदान दिले असून, येथून घडलेले हजारो विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. शाळेशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि विद्यालयाच्या भविष्यातील विकासात सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी २०२५ मध्ये 'माजी विद्यार्थी संघाची' स्थापना करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांना एका व्यासपीठावर आणणे, शैक्षणिक सुविधा निर्माण करणे आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या संघाचा मुख्य उद्देश आहे.
या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देण्यासोबतच शाळेच्या भविष्यातील उपक्रमांवर चर्चा केली जाईल. तसेच माजी विद्यार्थी संघाची अधिकृत सदस्य नोंदणीही यावेळी पार पडणार आहे. "ज्या शाळेने संस्कार आणि जीवनाची दिशा दिली, तिच्या विकासासाठी एकत्र येणे हीच आमची खरी कृतज्ञता आहे," अशी भावना संघाने व्यक्त केली आहे. या स्नेह मेळाव्यास सर्व माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.