loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत रिक्षाचालकांचे प्रबोधन, प्रमुख थांब्यांवर शेअर व मीटरचे अधिकृत दर फलक प्रसिद्ध

​रत्नागिरी (जमीर खलफे): आगामी गणेशोत्सव २०२६ चा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात चाकरमानी आणि पर्यटकांची होणारी प्रचंड गर्दी विचारात घेऊन रत्नागिरी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सणाच्या काळात प्रवाशांची अडवणूक रोखण्यासाठी आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी शहरातील प्रमुख रिक्षा थांब्यांवर आज शेअर ए-रिक्षा आणि ऑटो-रिक्षाच्या अधिकृत भाडेदराचे फलक अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानक, मारुती मंदिर आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन या अत्यंत गजबजलेल्या आणि मुख्य रिक्षा थांब्यांवर हे दरपत्रकाचे फलक लावले गेले आहेत. यामुळे आता स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना ठरवून दिलेल्या अधिकृत दराची माहिती त्वरित मिळणार असून, जादा भाडे आकारणीच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. दरपत्रक लावण्यासोबतच आज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून रिक्षाचालकांचे मार्गदर्शन केले. शहरातील मध्यवर्ती बस स्थानक, मारुती मंदिर, आरोग्य मंदिर, साळवी स्टॉप तसेच रत्नागिरी रेल्वे स्टेशन या सर्व प्रमुख ठिकाणी अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.

टाईम्स स्पेशल

या भेटीदरम्यान त्यांनी उपस्थित रिक्षाचालकांची बैठक घेऊन गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांशी कसे वर्तन ठेवावे याविषयी सविस्तर सूचना दिल्या. ​गणेशोत्सवात शहरात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडून मीटरप्रमाणेच अचूक भाडे आकारण्यात यावे, कोणत्याही कारणास्तव प्रवाशांशी हुज्जत घालू नये किंवा वादाचे प्रसंग उद्भवू देऊ नयेत, अशा कडक सूचना या वेळी देण्यात आल्या. तसेच लांबून येणाऱ्या प्रवाशांशी अत्यंत सौजन्याने आणि सहकार्याची भावना ठेवून वागण्याचे आवाहन रिक्षाचालकांना करण्यात आले. सणाच्या काळात रत्नागिरीची प्रतिमा मलिन होणार नाही आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, याची पूर्ण खबरदारी घेण्याचे निर्देश या वेळी प्रशासनाकडून स्पष्टपणे देण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg