loader
Breaking News
Breaking News
Foto

आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत मयुरेश परुळेकर विजेता

मालवण (प्रतिनिधी) - मालवणचा रहिवासी आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या मयुरेश लक्ष्मण परुळेकर याने आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय येथे दि. १ व २ सप्टेंबर रोजी आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील २० महाविद्यालयांमधील ७८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मयुरेशने स्पर्धेतील सात सामन्यांपैकी सहा सामन्यांत विजय मिळविला, तर एक सामना बरोबरीत सोडविला. ६.५ गुणांसह तो संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला आणि त्याने विजेतेपदावर आपले नाव कोरले. मयुरेशसोबतच संत राऊळ महाराज महाविद्यालयातील सौरभ धारगळकर, सोहम सावंत आणि मुलींच्या गटातील सानिका चव्हाण यांचीही आंतरविभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुढील फेरी मुंबई येथे होणार आहे. मयुरेशच्या या यशाबद्दल तसेच निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, क्रीडा विभाग आणि क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg