loader
Breaking News
Breaking News
Foto

करजुवेचे मोहन विचारे काळाच्या पडद्याआड

​संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - "काल-परवापर्यंत जे अत्यंत उत्साहाने भेटत होते, चेहऱ्यावर तेच नेहमीचे आपुलकीचे हास्यस्मित ठेवून प्रत्येकाची विचारपूस करत होते... ते अचानक असा जगाचा कायमचा निरोप घेतील याची पुसटशी कल्पनाही कोणी केली नव्हती!" ​करजुवे ता. संगमेश्वर येथील ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी, निष्ठावंत शिवसैनिक, अभ्यासू समाजसेवक व अजातशत्रू व्यक्तिमत्त्व मोहनराव विचारे (वय ७२) यांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी जगाचा अचानक निरोप घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मराठीत 'मोहन' या नावाचा अर्थ 'सर्वांचे मन जिंकणारा अन् सर्वांना आपलासा वाटणारा' असा होतो; आणि मोहनराव विचारे यांनी आपल्या दिलदार स्वभावाने अन् आपुलकीने खऱ्या अर्थाने या 'मोहन' नावाचा अर्थ आयुष्यभर सार्थ ठरवला. 'मोहन' नावाचा हा हक्काचा आधारवड असा अचानक निघून जाईल, यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच प्रत्येकाच्या काळजाला भोक पडले अन् काळजाला घर पाडणाऱ्या या धक्कादायक बातमीने संपूर्ण करजुवे गावासह खाडीपट्टा व संगमेश्वर तालुका पार स्तब्ध झाला. त्यांच्या या अकस्मात एक्झिटने कुटुंबीय, करजुवे गाव आणि मोठा मित्रपरिवार पूर्णपणे पोरका झाला आहे.

टाईम्स स्पेशल

मोहनराव विचारे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी संपूर्ण खाडीपट्ट्यासह तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची अन् नागरिकांची अलोट गर्दी जमली होती. त्यांचे अंतिम दर्शन घेताना उपस्थित प्रत्येकाचा कंठ दाटून आला होता. शोकाकुल वातावरणात, प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. "अहो मोहनराव, असे अचानक सोडून कुठे गेलात?" असा टाहो फोडणाऱ्या आप्तेष्टांना पाहून उपस्थितांची मने सुन्न झाली. शेवटी अश्रूंच्या धारा अन् जड अंतःकरणाने करजुवेवासियांनी आणि संपूर्ण मित्रमंडळींनी आपल्या या लाडक्या लोकनेत्याला व मार्गदर्शकाला अखेरचा निरोप दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg