दापोली (प्रतिनिधी) - निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम ..... , "ज्ञानोबा तुकाराम" असे म्हणत नामसप्ताहाच्या समारोपाच्या निघालेल्या दिंडीने अखंड केळशी गावाचे वातावरण पूर्णपणे भक्तिमय केले. केळशी गावाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक एकतेच्या परंपरेचे पूर्वापार महत्त्व आहे अशा या केळशी येथील ग्रामदैवत कालभैरव जोगेश्वरी मंदिरात मागील सात दिवसांपासून अहोरात्र सुरू असलेल्या नामसप्ताहाची सांगता मोठ्या भक्तिभावाच्या उत्साहात पार पडली. श्रावण वद्य प्रतिपदेला या मंदिरांत नामसप्ताहाला प्रारंभ होतो. प्रतिपदेपासून अष्टमीपर्यंत उभे राहून अहोरात्र भजने म्हटली जातात.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा महामारी आली त्यावेळी गांवातील द्वीपद - चतुःपद प्राण्यांचे रक्षण करा अशी प्रार्थना करून समस्थ ग्रामस्थानी हा नामसप्ताह सुरू केला होता तो अद्यापही चालू आहे. या भजनांचे पहारे ३ - ३ तासांचे असून त्यामध्ये अनुक्रमे माळी, नवानगर गांवकरी, भंडारी मूळगांवकरी व नाभिक समाजाचे असतात. इतर पाखाड्या किंवा आळ्यांकडे अन्य सेवा सुपूर्द केलेल्या असतात. ही नामसप्ताहाची पुर्वापार सुरू असलेली परंपरा आजही त्याच भक्तीभावाने तशीच सुरू आहे त्याचे महत्त्व तसुभरही कमी झालेले नाही हे केळशी गावाचे वेगळेपण आहे. या नामसप्ताहामध्ये श्रीकालभैरव – जोगेश्वरीचा श्रीविठ्ठल-रखुमाईच्या स्वरूपात मुखवास असतो. त्यावेळचे ते देखणे-साजिरे श्रीविष्णूरूप पहायला अठरा पगड ज्ञातीचे सर्व अबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष सात दिवस येत असतात. या सप्ताहात पण नारळाची तोरणे, पूजा-साहित्य, प्रसाद, केवड्याची / चाफ्याची फुले व पुष्पहार मोठ्या प्रमाणात देवाला अर्पण करतात. नवस बोलले. जातात, फेडले जातात.
सातव्या दिवशी नामसप्ताहाची समाप्ती होते. त्यावेळी मंदिरातून दिंडी निघते "निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम" किंवा "ज्ञानोबा तुकाराम" असे म्हणत ही दिंडी गावातील सर्व देवळांत श्रीफळ ठेवून पुन्हा कालभैरव मंदिरात परत येते. त्यावेळी गुरवांकरवी सर्व भजनी पहारेकरांना व मानकऱ्यांना श्रीफळ व देवार्पण झालेल्या पुष्पमालां प्रसाद म्हणून दिल्या जातात व सर्व ग्रामस्थ प्रसाद घेऊन घरोघरी जातात. त्यानंतर पुरोहितांकरवी देवाला एकादशणी करून सर्व देवांना वरण-भाताचे नैवेद्य दाखविले जातात. त्याच दिवशी दुपारनंतर आळी-आळीतील लोक सनई ढोलाच्या तालासूरांत “गोविंदा आला रे आला .वाडीवाला" किंवा "गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, राधाकृष्णाला संगत घ्या" अशा प्रकारची गाणी म्हणत हातात हात धरून नाचत येतात.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.