loader
Breaking News
Breaking News
Foto

गोवंश तस्करीवर कठोर कारवाई; पोलिसांच्या तत्परतेबद्दल युवा क्रांती सेनेकडून विशेष सत्कार

रत्नागिरी (जमीर खलफे) : फणसवळे येथील गोवंश वाहतूक प्रकरणात रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईबद्दल युवा क्रांती सेनेतर्फे पोलिसांचे शाल व झाड देऊन अभिनंदन करण्यात आले. ३ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना फणसवळे परिसरात एक संशयास्पद चारचाकी वाहन आढळून आले. पोलिसांना पाहताच वाहनातील व्यक्तींनी वाहन घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनाच्या चाकात गोवंश अडकल्याने वाहन थांबले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मोहसीन बाबू कुरेशी (३०, मीरा रोड) आणि शहेनशाहा अब्दुल सत्तार शेख (४८, माहिम) यांना ताब्यात घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणातील अन्य दोन आरोपी अस्लेम (बांद्रा-कुर्ला) आणि देवा (विरार) हे फरार असल्याचे सांगण्यात आले.गोवंश वाहतूक प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक करत युवा क्रांती सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल व झाड देऊन सत्कार केला. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कामाचे यावेळी कौतुक करण्यात आले. यावेळी युवा क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचे अभिनंदन करून, समाजात कायदा व सुव्यवस्था तसेच प्राणी संरक्षणाबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg