loader
Breaking News
Breaking News
Foto

शरद पवार पक्ष आणि काँग्रेस यांच्यात नवे समीकरण, राहुल गांधी-रोहित पवार यांची जवळीक

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या पक्षात नवी समीकरणे जुळत आहेत. हे दोन्ही पक्ष अधिक जवळ येतानाचे दिसून येत आहेत. राहुल गांधी आणि रोहित पवार यांची जवळीकता अधिक वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुढील राजकारणात या दोन पक्षांचे एकत्रित समीकरण प्रभावी ठरणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर रोहित पवार यांनी अपघातासंदर्भात राहुल गांधी यांच्याकडे संपर्क साधला अणि राहुल गांधी यांनी त्यांना आश्वासन दिले. ‘लढत रहा, आपल्या विचारधारेची वेळ निश्चित येईल’ असे राहुल गांधी यांनी रोहित पवार यांना सांगितले होते. विमान दुर्घटनेची तक्रार रोहित पवार यांची महाराष्ट्रात घेण्यात आली नाही, म्हणून बेंगलोरमध्ये जावून त्यांनी तक्रार केली. गुन्हा कोठेही घडलेला असो, तक्रार कोठेही देवू शकतो, या निकषानुसार त्यांनी तक्रार दिली. पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमादरम्यान रोहित पवार यांनी असंख्य पोस्टर लावून राहुल गांधींचे स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रोहित पवार यांनी म्हटले आहे की, ‘आमच्या पक्षाच्या नावातच काँग्रेस शब्द आहे. आमच्या विचारधारेत अंतर नाही. पवार साहेब काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस पार्टी आमच्यासाठी नवी नाही. आम्ही दशकांपासून सहकारी आहोत. आता आमच्यासमोर २०२९ मध्ये राज्य आणि केंद्रात सत्ता परत आणण्याचे लक्ष आहे’ रोहित पवार यांनी म्हटले आहे की, राहुल गांधींपासून आम्हाला प्रेरणा मिळते. राज्यात आम्हाला विरोधी पक्षनेत्यापासून वंचित करण्यात आले. मात्र लोकसभेमध्ये विरोध पक्षनेता राहुल गांधी आहेत. ते आमचेही नेते आहेत.

टाईम्स स्पेशल

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी आणि रोहित पवार यांच्यात गुप्त बैठका घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जरी स्वतंत्र असला तरी येत्या काळात रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करु शकतात, असे राजकीय तज्ञांचे मत आहे. एका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, ‘या चर्चांना राजकी हवा देणे आताच योग्य ठरणार नाही, तसेच हे अविश्वसनीय असेही म्हणता येणार नाही.’

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg