पनवेल : आगामी गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी खांदेश्वर पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत महत्त्वाच्या सूचना दिल्या. सेक्टर ११, खांदा कॉलनी येथील खान्देश हॉलमध्ये झालेल्या बैठकीस सुमारे ५० ते ६० मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत गणेशोत्सवासाठी जागामालक तसेच संबंधित विभागांच्या आवश्यक परवानग्या घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासनाने निर्धारित केलेल्या अटी-शर्तींचे पालन करूनच मंडप उभारावेत. ऊन, वारा, पाऊस तसेच भटक्या जनावरांपासून गणेशमूर्तीचे संरक्षण होईल, अशा पद्धतीने मंडप व स्टेज उभारण्याचे निर्देश पोलिसांनी दिले.
गणेशमूर्तीची स्थापना झाल्यानंतर मंडपात दिवस-रात्र स्वयंसेवक तैनात ठेवावेत तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना देण्यात आल्या. ध्वनिक्षेपक वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे सांगण्यात आले. तसेच डीजे, डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटचा वापर करू नये, असे स्पष्ट करण्यात आले. गणेशोत्सवातील देखावे व फलकांमध्ये कोणतेही आक्षेपार्ह स्वरूपाचे साहित्य ठेवू नये. दर्शनासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा ठेवाव्यात. आगमन व विसर्जन मिरवणुका रस्त्याच्या शक्यतो एका बाजूने काढाव्यात आणि गर्दी नियंत्रणासाठी शक्य असल्यास दोरीचा वापर करावा, अशाही सूचना देण्यात आल्या.
विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची आरटीओकडून तपासणी करून घेणे तसेच चालकाचा परवाना तपासणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक परवानगीसाठी अर्ज लवकरात लवकर सादर करावेत, असे आवाहनही करण्यात आले. दरम्यान, बैठकीस उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांपैकी २३ गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १६८ अन्वये नोटीस बजावण्यात आली असून, उर्वरित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनाही नोटीस देण्यात येणार आहे. बैठकीत पोलिसांनी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे स्पष्ट केले. बैठकीसंदर्भातील माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी सादर केली.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.