loader
Breaking News
Breaking News
Foto

आज खेडमध्ये उबाठा शिवसेना युवासेनेचा दहीहंडी उत्सव जल्लोषात; महिलांसाठी खास आकर्षण 'खेळ पैठणीचा'

खेड : शिवसेना युवासेना खेड आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाचे आज खेड शहरात आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला समस्त खेड तालुका वासियांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना युवासेना खेडच्या वतीने करण्यात आले आहे. या उत्सवासाठी शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, ही नम्र विनंती करण्यात आली आहे. प्रथमच यावर्षी महिलांसाठी खास आकर्षण म्हणून "खेळ पैठणीचा" हा मनोरंजक कार्यक्रम आयोजित केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृह शेजारी, खेड येथे आज सायंकाळी ४ वा. पासून उत्सवास सुरुवात होणार आहे. खेडमधील गोविंदा पथकांसह नागरिकांमध्ये या दहीहंडी उत्सवाबद्दल प्रचंड उत्साह असून मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा होणार आहे. सर्वांनी उपस्तित राहावे, असे आव्हान युवा सेना नेते अजिंक्य मोरे, तालुका प्रमुख सचिन निकम यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg