loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगडमध्ये संजय गांधी योजनेचे ३६ प्रस्ताव मंजूर

देवगड (प्रतिनिधी) - संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती देवगडची बैठक तहसीलदार देवगड यांच्या दालनात पार पडली. या बैकित संजय गांधी योजनेंतर्गत ४१ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यापैकी, एकूण ३६ प्रस्तावांना समितीच्या वतीने मंजुरी देण्यात आली असून ५ प्रस्ताव त्रृटींच्या पुर्ततेसाठी प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. १ प्रस्ताव नामंजूर करण्यात आलेला आहे. देवगड तहसीलदार यांच्या दालनात मंगळवार दि.८ सप्टेंबर रोजी संजय गांधी समितीची बैठक अध्यक्ष मिलींद साटम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तहसीलदार शीतल जाधव, प्रभारी गटविकास अधिकारी निलेश जगताप, मुख्यकार्यकारी अधिकारी हरीदत माने, नायब तहसीलदार संतोष खरात, अशासकिय सदस्य सुहास राणे, दिलीप वाडेकर, मनोज जाधव, रामचंद्र कोकरे, सुहास राणे, प्रकाश राणे, सहायक महसूल अधिकारी सुधीर साळूंखे, तांत्रिक सहाय्यक योगीता गोवेकर आदी सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बैठकीत संचाली मोहन घाडीगावकर रा.फणसगांव, अरुणा नामदेव जाधव रा. जामसंडे, स्‍वप्‍नाली उमेश पुजारे रा.नाडण, प्राची प्रदिप मुळये रा. नारिंग्रे, संतोष गणपत मिठंबावकर रा.सांडवे, अक्षय प्रकाश बावकर रा.पडेल, प्रकाश सुभाष ओंबळकर रा.वरेरी, पियुष अतुल घाडी रा.पुरळ, नामदेव गोपाळ गायकवाड रा.लिंगडाळ, आकाराम भिकाजी घाडी रा.शेवरे, अनघा अनंत पवार रा.देवगड, दिलीप गोपाळ जाधव रा.दाभोळे, सुरेखा सूर्यकांत जाधव रा.जामसंडे, सुहासिनी गोपाळ धुरी रा.जामसंडे, वासंती नारायण राणे रा.पोयरे, रमेश विश्‍वनाथ सावंत रा.नाडण, वनिता रमेश सावंत रा.नाडण, चंद्रकात केशव पवार रा.ओंबळ, विजय मोहन मेस्‍त्री रा.वाडा, भरत जगन्‍नाथ परब रा.वाडा, अनिता अशोक मेस्‍त्री रा.जामसंडे, प्रभावती मधुकर पवार रा.चाफेड, दिप्‍ती दिगंबर शिवलकर रा.दहिबांव, सुमती तुकाराम भाट रा.मुटाट, ललिता पंढरीनाथ भोवर रा.जामसंडे, रुक्मिणी विठ्ठल लब्दी रा.तळवडे, आनंद विठ्ठल कदम रा.देवगड किल्‍ला, सुनीता महादेव गुरव रा.मणचे, अस्मिता अनिल मयेकर रा.जामसंडे, राजश्री एकनाथ घाडी रा.चाफेड, जया मनोहर गांवकर रा.नारिग्रे, प्रमिला प्रकाश चव्‍हाण रा.शिरगांव, शोभना नंदकिशोर मेस्‍त्री रा.शिरगांव, सत्‍यवती गणपत तिर्लोटकर रा.तिर्लोट, शोभा गोपाळ पेडणेकर रा.दहिबांव आदी लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg