loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत रोटरी स्कूलचे वर्चस्व

खेड - क्रीडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर 2026 रोजी हाजी मुकादम हायस्कूल खेड येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय बुदिधबळ स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादित करुन प्रशालेचे नाव उज्ज्वल केले आहे. या तालुकास्तरीय शालेय बुदिधबळ स्पर्धेत तालुक्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीबळ खेळातील कसब दाखवत प्रत्येक गटात क्रमांक पटकावून बुदिधबळ खेळातील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यामध्ये 14 वर्षाखालील मुली या गटात राधिका पाटील - तृतीय क्रमांक, कांक्षी भांड पाचवा क्रमांक. 17 वर्षाखालील मुले या गटात सर्वेश दामले - प्रथम क्रमांक, मानस यदमळ - द्वितीय क्रमांक, युवराज देवघरकर - पाचवा क्रमांक. 17 वर्षाखालील मुली या गटात प्रिया बोटे - द्वितीय क्रमांक, वेदा मेहता - तृतीय क्रमांक. 19 वर्षाखालील मुले या गटात वेदांत मेहता द्वितीय क्रमांक, ओजस गुहागरकर - तृतीय क्रमांक, अजिंक्य आपटे चतुर्थ क्रमांक. 19 वर्षाखालील मुली या गटात अफ्रा परकार - द्वितीय क्रमांक पटकावला.

टाईम्स स्पेशल

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची रत्नागिरी येथे होणाऱ्या शालेय जिल्हास्तरीय बुदिधबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका शीतल घाणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वरील यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg