loader
Breaking News
Breaking News
Foto

“खेड-मंडणगडमध्ये शिवसेनेची संघटनात्मक मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव घेणार पदाधिकाऱ्यांच्या बैठका”

खेड - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव हे शुक्रवार, दि. 11 सप्टेंबर 2026 रोजी खेड व मंडणगड तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्याबरोबरच पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिकांशी संवाद साधणार आहेत. दौऱ्याची सुरुवात सकाळी 11 वाजता मंडणगड येथे होणार असून, पक्षाच्या तालुकाप्रमुख निवडीसंदर्भात आयोजित बैठकीस जाधव उपस्थित राहणार आहेत. ही बैठक भाई साटम यांच्या कृपा सिंधू बंगल्यावर, बोरीचा माल, मंडणगड येथे होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर दुपारी 2.30 वाजता खेड तालुका कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक जनार्दन मोरे (शाखाप्रमुख) यांच्या निवासस्थानी असलेल्या सभामंडपात, मु.पो. कळंबणी (आपेडे फाटा), ता. खेड येथे होणार आहे. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा तसेच आगामी काळातील पक्षाच्या कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह, खेड येथे खेड शहरातील नागरिक तसेच शिवसैनिकांच्या गाठीभेटींचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विक्रांत जाधव नागरिक व शिवसैनिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार असून, त्यांच्या अडचणी व विविध प्रश्न जाणून घेणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने मंडणगड व खेड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg