loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यापीठामध्ये ५४ व्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचे आयोजन!

दापोली(प्रतिनिधी) - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ५४ व्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची बैठक दिनांक ०९ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैय्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीच्या उद्द्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री दत्तात्रय भरणे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तर सदर कार्यक्रमाला भरत गोगावले, मंत्री, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास, डॉ. उदय सांमत, मंत्री, उद्योग व मराठी भाषा, योगेश कदम, राज्यमंत्री, गृह, शहरे, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, नागरी सुरक्षा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, आशिष जयस्वाल, राज्यमंत्री, वित्त नियोजन, कृषि, मदत व पुर्नवसन, विधी व न्याय, कामगार, खासदार सुनिल तटकरे, तुषार पवार, उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संधोधन परिषद, पुणे हे प्रमुख म्हणून तर विशेष उपस्थितीमध्ये परिमल सिंग, सचिव, कृषि, राहुल महिवाल, महारां चालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संधोधन परिषद, पुणे, सुरज मांडरे, आयुक्त, कृषि, महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर चारही विद्यापीठाचे कुलगुरु उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून यजमान विद्यापीठाचे कुलक्त डॉ. संजय भावे हे भूषविणार आहेत.

टाइम्स स्पेशल

तीन दिवस चालणार्‍या या बैठकीमध्ये चारही कृषि विद्यापीठामध्ये गतवर्षात झालेल्या संशोधनावर साकल्याने चर्चा होणार असून चारही कृषि विद्यापीठातील ३०० हून अधिक शास्त्रज्ञ राहभागी होणार आहेत. बैठकीमये शेतकरी, कृषि विभाग, दुग्धशास्त्र विभाग, हवामान विभाग इत्यादीसाठी महत्वपूर्ण संशोधनपर शिफारशीदेखील सादर करण्यात येणार आहेत. यावर्षीच्या बैठकीच्या यजमानपदाचा मान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीला मिळाला असून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्यावतीने प्रसारणाकरीता यंत्र अवजारे १, विविध पिकांतील तंत्रज्ञान शिफारशी ३६ आणि पूर्व प्रसारणाकरीता एका वाणाची शिफारस करण्यासाठी बैठकीमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांचे प्रस्तावित वाण १०, प्रसारणाकरीता यंत्रे अवजारे १६, पिक तंत्रज्ञान शिफारशी ८६, पूर्व प्रसारणाकरीता वाण ०६ तर महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचे प्रस्तावित वाण ११, प्रसारणाकरीता यंत्रे अवजारे ०५, पिक तंत्रज्ञान शिफारशी ८६, पूर्व प्रसारणाकरीता वाण ०९ व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांचे प्रस्तावित वाण ०५, प्रसारणाकरीता यंत्रे अवजारे ०४, पिक तंत्रज्ञान शिफारशी ४२ या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याअंतर्गत येणार्‍या कृषि, मत्स्य, फलोत्पादन, पणन इत्यादी महत्वाच्या विभागांचे सादरीकरण होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg