loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी जलसंपदा विभाग वसाहत मध्ये साफसफाई केली नसल्याने 'नागराज' घुसले घरात!

दोडामार्ग(प्रतिनिधी)- तिलारी जलसंपदा विभाग मुख्य वसाहत कोनाळकट्टा या ठिकाणी शासकीय खोल्या यामध्ये अनेक खाजगी भाडेकरू तसेच काही सरकारी कर्मचारी देखील राहतात. काही दिवसांपूर्वी येथील महेश चिरमुरे यांनी उपविभाग अधिकारी गजानन बुचडे याना निवेदन देऊन वसाहत मधिल झाडे झुडपे साफसफाई करावी अशी मागणी केली होती. पण संबधित मक्ता घेतलेल्या इसमाने पावसाळ्यात साफसफाई केली नाही. यामुळे गुरुवारी महेश चिरमुरे यांच्या घरात चक्क नाग सापाने प्रवेश केला. अखेर वनविभाग यांना फोन करून सर्पमित्र लाडू गवस याने नागाला पकडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तिलारी जलसंपदा विभाग कोनाळकट्टा मुख्य वसाहत ठिकाणी मोठया प्रमाणात झाडी वाढली आहे. यामुळे साप विंचू तसेच इतर सजीव जीव खोल्यामध्ये प्रवेश करतात. यामुळे घरात राहाणारे नागरिक यांचा जीव धोक्यात आला आहे. तेव्हा जलसंपदा विभाग उपविभाग अधिकारी यांनी तातडीने गणेश चतुर्थी पूर्वी साफसफाई करावी अशी मागणी महेश चिरमुरे यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg