loader
Breaking News
Breaking News
Foto

राजेश सावंत ठरले जि.प. आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिन म्हणजे शिक्षक दिन!या दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रम, प्रकल्प, विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण दर्जेदार शिक्षण, शिष्यवृत्ती परीक्षा, राष्टीय व सामाजिक अशा अनेक प्रकारचे कार्य करणार्‍या शिक्षकांना प्रोत्साहनपर रत्नागिरी जिल्हा परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे संगमेश्वर तालुक्यातील पूर शाळेतील चालू वर्षाचे मानकरी ठरलेले एक उपक्रमशील कर्तव्यनिष्ठ तितकेच संवेदनशील विद्यार्थी प्रिय व्यक्तीमत्व शिक्षक राजेश अर्जून सावंत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शालेय अभ्यास व अध्यापनाबरोबर ज्ञान रचनावादातून पारंपारीक सण, समारंभ व संस्कृती जतन करण्याच्या हेतूने विविध उपक्रम, गोष्टी माहीत करून देतांना दुर्गवीर प्रतिष्ठान सारख्या मंडळाकडून शिवकालीन गड, किल्ले, तसेच त्यांची सफाई व स्वच्छता, सांघीक वृत्ती अशा प्रकारची माहिती उपक्रम सुद्धा सावंत यांनी मुलांसाठी राबवले आहेत. अगदी साधी राहणी, वागण्यात सदा नम्रता, शाळेत नाविण्यपूर्ण सर्जनशील उपक्रम, गरीब होतकरू मुलांसाठी पुढाकार, मुलांमध्ये नेहमी हसतमुख, पालक, सर्वच क्षेत्रात व मित्र परिवारांत व समाजात मिळून मिसळून वागणारे, कलेची आवड असणारे असं हे व्यक्तीमत्त्व शिक्षकी पेशा सांभाळत आपल्या कामाचा ठसा उमटवला.

टाईम्स स्पेशल

त्याचीच पोच म्हणून रत्नागिरी जि. प. ने शाब्बासकिच्या रूपाने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला. प्रा. शिक्षक संघटनेत सुद्धा सावंत यांचं मोलाचे योगदान मानले जाते. त्यांच्या जवळ उत्तम संघटन कौशल्यही असल्याने शिक्षक वर्गात सुद्धा प्रिय आहेत. सावंत यांचा पुरस्कार म्हणजे त्यांच्या अगदी प्रामाणिक व खर्या कामाची जिल्हा परिषदेने घेतलेली दखल असंच म्हणता येईल. सावंत यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या अनेक शिक्षक मित्रपरिवार व हितचिंतक, अधिकारी वर्ग आदी मंडळीकडून अभिनंदनाचा वर्षावं होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg