loader
Breaking News
Breaking News
Foto

जगबुडी नदीवरील गणेश विसर्जन घाट दुरूस्ती करा; युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचा नगरपरिषदेला कणखर इशारा

खेड (प्रतिनिधी) : खेड शहरातील जगबुडी नदीवरील गणेश विसर्जन घाटाची अवस्था अत्यंत बिकट व धोकादायक झाली असून गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही दुरुस्तीची कामे पूर्ण न झाल्याबद्दल युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघने खेड नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दि. ०३ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्याधिकारी, खेड नगरपरिषद यांना दिलेल्या निवेदनात संघाने म्हटले आहे की, दरवर्षी हजारो गणेशभक्त, महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले या घाटावर विसर्जनासाठी येतात. प्रत्यक्ष विसर्जनाच्या वेळी विसर्जन कट्‌ट्याचे सदस्य व स्वयंसेवक जीव धोक्यात घालून नदीपात्रात उतरून मूर्ती विसर्जित करतात. अशा वेळी घसरड्या पायर्‍या, तुटलेला प्लॅटफॉर्म, खोल पाणी आणि असुरक्षित घाटामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विसर्जनापूर्वी दुरुस्ती न झाल्यास व दुर्घटना घडल्यास संबंधित यंत्रणेवर प्रशासकीय जबाबदारी निश्चित करावी, अन्यथा लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा संघाने दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी रत्नागिरी, प्रांत अधिकारी खेड, तहसीलदार खेड व पोलीस निरीक्षक खेड यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर, तालुकाध्यक्ष मिलिंद जाधव व शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg