loader
Breaking News
Breaking News
Foto

आरोस येथे १०० गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप

आरोस - आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळ, आरोस आणि शिक्षण प्रसारक मंडळ, आरोस यांच्या संयुक्त विद्यमाने आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल तसेच विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस बाजार येथील ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या वतीने तसेच शिवसेना नवी मुंबईचे उपजिल्हाप्रमुख महेश परब आणि सानपाडा येथील अशोक आंगचेकर यांच्या सहकार्याने आरोस व कोंडुरा येथील हायस्कूलमधील एकूण १०० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक करत आभार व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच देवी सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ,मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद परब, सिंधुदुर्ग बँक संचालक विद्याधर परब, निलेश परब, हेमंत कामत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, शंकर नाईक, बाळा शिरसाट, संजय पांगम, राजन नाईक, भरत पुरोहित, संदीप नेमळेकर, समीर पालव, योगेश नाईक, बाळा मोरजकर, तानाजी खोत, बाबी परब, प्रसाद नाईक, बबन मुळीक, प्रितेश मुळीक, उमेश गावडे, रामचंद्र गावडे, अनिल नाईक, अर्जुन मुळीक, प्रसाद मडूरकर, वैशाली सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमात किशोर पाटकर यांच्या वतीने १०० गरजू विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या. मात्र, सायकल मिळू न शकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद परब यांच्या वतीने पुस्तके देण्याचे आश्वासन देण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक तानाजी वरक व सुषमा मांजरेकर यांनी केली. आभार प्रदर्शन सदाशिव धूपकर व अनिल नाईक यांनी केले. यावेळी शिवसेना पदाधिकारी, प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करताना होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg