loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली केंद्राची तिसरी शिक्षण परिषद उत्साहात

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नंबर २ येथे इन्सुली केंद्राची तिसरी शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली. ​परिषदेचा प्रारंभ विद्यादेवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा सावंत यांनी केंद्रप्रमुख ठाकूर यांच्यासह उपस्थित सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केले. परिषदेच्या पहिल्या सत्रात केंद्रप्रमुख ठाकूर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडवणाऱ्या इन्सुली नंबर १, ३, ४ आणि ५ या शाळांतील शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले. त्यानंतर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या सूचनेनुसार मागील महिन्यातील अभ्यासक्रम, शैक्षणिक अडचणी, त्यावरील उपाय आणि शाळांमधील उत्कृष्ट उपक्रम यावर शिक्षकांमध्ये सखोल चर्चात्मक देवाणघेवाण झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​दुसऱ्या सत्रात विविध शैक्षणिक विषयांवर तज्ज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले: राधिका परब यांनी नवोपक्रमाची गरज आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. धनदा शिंदे यांनी विद्यार्थ्यांचा पोर्टफोलिओ कसा तयार करावा आणि तो अद्ययावत कसा ठेवावा याविषयी माहिती दिली. महेश सावंत यांनी इंग्रजी विषय सोपा आणि रंजक करण्यासाठीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या परिषदेत केंद्रातील सर्व शिक्षकांनी एकत्रित येत गटवार कार्य केले. यामध्ये इयत्ता २ री, ३ री, ४ थी आणि ६ वी साठी 'कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण' (क.का.शा.) या विषयांचे सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांचे मासिक नियोजन तयार करून त्याचे प्रभावी सादरीकरण केले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रम प्रसंगी केंद्रप्रमुख ठाकूर यांनी उपस्थित शिक्षकांना आवश्यक प्रशासकीय बाबींविषयी सविस्तर माहिती व सूचना दिल्या. ​संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार रुपाली गवस यांनी मानले. या शिक्षण परिषदेस इन्सुली केंद्रातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg