दापोली : कोकणच्या समृद्ध लोकपरंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या ‘श्रावणधारा’ या लोकसंस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन वराडकर-बेलोसे महाविद्यालय, दापोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि कोकणच्या लोकसंस्कृतीशी त्यांची नाळ अधिक घट्ट व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयात दरवर्षी ‘श्रावणधारा’ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाच्या कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या एकूण २४ समूहांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कारातून कोकणातील पारंपरिक जीवनशैली, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचे सुंदर दर्शन घडविले. जाखडी, कोळी नृत्य, श्रावणातील पारंपरिक गाणी, कविता तसेच विविध लोककला आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमात रंगत आणली.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणाला उपस्थितांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. पारंपरिक कोकणी लोककलेचा बाज, श्रावणातील गाण्यांची सुरेल मैफल आणि विविध कलाविष्कार यामुळे संपूर्ण वातावरण सांस्कृतिक रंगांनी न्हाऊन निघाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारातून ‘कोकणची माती आणि कोकणची संस्कृती’ यांचे प्रभावी दर्शन घडले. कार्यक्रमास आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोलीचे कार्यवाह डॉ. दशरथ दाजीराव भोसले तसेच लक्ष्मीकांत पाटील (पर्यवेक्षक, कनिष्ठ महाविद्यालय) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वराडकर-बेलोसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड होते.
या कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले. सांस्कृतिक प्रमुख प्रा. उत्तम पाटील, एफ. के. मगदूम, मानसी कोवळे, महाविद्यालयीन सांस्कृतिक प्रतिनिधी रीतीशा कुरुलकर तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक मंडळाचे सदस्य यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी देतानाच कोकणची लोकपरंपरा आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारा ‘श्रावणधारा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्मरणीय ठरला.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.