loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद अध्यक्ष ‘प्रमोद कामत’ यांच्या स्वखर्चातून बांदा-पत्रादेवी रोडवरील खड्डे बुजविण्यास सुरुवात

बांदा(प्रतिनिधी)- बांदा-पत्रादेवी रोडवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन बांदा भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याकडे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत प्रमोद कामत यांनी स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात करून दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कामावर बांदा ग्रामपंचायतीच्या सरपंच अपेक्षा नाईक, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगडकर, जावेद खतीब तसेच भाजपचे अन्य पदाधिकारी यांनी जातीने लक्ष देत खड्ड्यांमध्ये काँक्रीट भरून ते बुजविण्याचे काम करून घेतले. त्यामुळे रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांपासून वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

टाईम्स स्पेशल

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांदा-पत्रादेवी मार्गावर वाहनांची वर्दळ वाढणार असल्याने खड्डे बुजविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. नागरिकांच्या मागणीची दखल घेत स्वखर्चातून रस्त्याची डागडुजी करून दिल्याबद्दल ग्रामस्थ व भाजप पदाधिकार्‍यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg